बीड : 39 बीड लोकसभा मतदार संघांतर्गत 228 गेवराई, 229 माजलगाव, 230 बीड, 231 आष्टी, 232 केज व 233 परळी वैद्यनाथ या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, व्हिडिओग्राफर, वाहन चालक इत्यादी मतदारांचे फॉर्म नं. 12 मंजूर असलेल्या टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान करून घेण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुविधा मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. सुविधा मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी वेळापत्रक ठरविण्यात आले आहे.
वेळापत्रक
मतदान सुविधा केंद्र- दि. 10, 11 व 12 मे 2024 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत टपाली मतदानाची वेळ ठरविण्यात आली आहे.
मतदान केंद्र ठिकाणाचा पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रा.पं., जि.प. निवडणूक विभाग, कक्ष क्रमांक 18
टपाली मतदानासाठी केंद्रावरील केंद्रप्रमुख ना. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड, एम. व्ही. काळे ,मतदान अधिकारी-1 क.प्र.अधिकारी, पंचायत विभाग, जि. प., बीड, मनोज किंबहने, मतदान अधिकारी 2 प्रा.प्र. जि. प.प्र शाळा, शिवाजीनगर केंद्र अजीजपुरा, एस.बी. शेंडगे, मतदान अधिकारी 3, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, एस. बी. बांगर यांची नियुक्ती जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी केली आहे.
`