बीड : वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांकाची संधी परिवहन विभागाने दिली आहे. परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका MH23BJ ही सदयस्थितीत सुरु असून सदर मालिकेतील नोंदणी क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी MH23BK 0001 ते 9999 ही मालिका दिनांक 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु करण्यात येईल,
ज्या वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावायाचा असेल त्यांनी आपला विहीत नमुन्यातील अर्ज, सदरील आकर्षक क्रमांकाला लागू असलेली फी च्या रकमेचा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड यांच्या नावाचा धनादेश डि.डि व आपल्या ओळखपत्राच्या व आधार कार्डच्या साक्षांकीत प्रतीसह दिनांक 29/01/2024 ते 07/02/2024 रोजी दुपारी 2.00 पर्यंत परिवहनेत्तर शाखेमध्ये खिडकी क्र. 01 वर जमा करावा.
सदर मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व मा. परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार करण्यात येईल. तसेच एकाच आकार्षक क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या अजाँची नोटीस दिनांक 07/02/2023 रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर दुपारी 04.00 वाजता प्रसिध्द करण्यात येईल. दिनांक 09/02/2024 रोजी एकपेक्षा जास्त अर्ज असलेल्या अर्जदारांनी दुपारी 1.00 वाजेपर्यंत बंद लिफाफयामध्ये मुळ शुल्का व्यतिरिक्त अधिक रकमेचा धनादेश जमा केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 03.00 वाजता लिलावाची विहित कार्यपध्दती अवलंबून नोंदणी करून पसंतीचे क्रमांकाचे वाटप करण्यात येईल.