जिल्ह्यातील विकासात्मक कामांचा पालकमंत्री धनंजय मुंडे घेणारा आढावा
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीडचे पालकमंत्री म्हणून अतुल सावे यांनी बीड जिल्ह्याकडे कायम दुर्लक्ष केले यामुळे जिल्ह्यातील अनेक विकासकामे रखडली असून याचा त्रास जिल्हावासीयांना होत आहे. त्यानंतर नुकतीच बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर धनंजय मुंडे उद्या बीडमध्ये येत असून दुपारी 3 वाजता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाप्रशासनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या बैठकीला जिल्हा प्रशासनातील सर्वच संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
बीडचे पालकमंत्री म्हणून जेव्हापासून अतुल सावे यांनी कामकाज पाहिले तेव्हापासून बीड जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनामध्ये सावळा गोंधळ पहायला मिळाला. सावेंना अधिकाऱ्यांवर म्हणावा असा वचक ठेवता आला नाही यामुळे अनेक विभागामध्ये अधिकाऱ्यांची मनमानी पहायला मिळाली, यानंतर नुकतीच बीडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती झाली असून या नियुक्तीनंतर ते उद्या बीडमध्ये येत असून दुपारी 3 वाजता आढावा बैठक घेणार असून या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाबाबत माहिती घेणार आहेत. उद्याच्या बैठकीच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्या उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत.