उमरगा : प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक गुणवत्तेत मध्ये खंड पडू नये म्हणून covid-19 च्या उद्भवलेल्या परिस्थितीत मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक श्री बशीर शेख क्रीडाशिक्षक बाबासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन दहावीच्या सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व लिहिण्यासाठी बारकोड उत्तर पत्रिका देऊन मार्गदर्शन केले. या वर्षी दहावीच्या मुलांना एक जुलैपासून ऑनलाइन क्लास चालू करून व 23 नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष अध्यापन करून सर्व विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला व प्रत्यक्ष वर्गात दोन सराव परीक्षा घेण्यात आल्या. तिसरी सराव परीक्षा 1 एप्रिलपासून घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु 29 तारखेपासून परत कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या .दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन दहावीच्या सराव प्रश्नपत्रिका व बारकोड च्या उत्तर पत्रिका देण्याचा उपक्रम हाती घेऊन तो प्रत्यक्षात राबवण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांनी घेतली आहे . या उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.