बीड प्रतिनिधी : दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी एक वाजता जिल्हास्तरीय समन्वय समिती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, डॉ.नागेश चव्हाण (जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड) डॉ. उल्हास गंडाळ( जिल्हा आरोग्य अधिकारी जि प बीड) सचिन पांडकर (अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीड )डॉ. सुमित साबळे, डॉ .सिद्धेश्वर फड ,डॉ. पि के पिंगळे ,जी एम खाडे सर्व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस जी दबडगावकर (दंत शल्यचिकित्सक तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम बीड) अभिजीत संगई (एमजीव्हीएस छत्रपती संभाजीनगर ) तत्त्वशील कांबळे (जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ तथा अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान बीड) ,करुणा गायकवाड आदी उपस्थित होते सदरच्या बैठकीत जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासंबंधी काय महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली यामध्ये तालुकास्तरावरील सनियंत्रण समितीस तात्काळ स्थापन करून तंबाखू धूरमुक्त बीड जिल्हा करण्याकरिता सदरील कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी पदाधिकारी यांना दिले तसेच सर्व आस्थापना प्रमुखांनी महिन्याच्या पहिल्या सोमवारी कार्यालयामध्ये तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यासंबंधीचे आदेश यावेळी देण्यात आले अशा रीतीने तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय मौखिक आरोग्य तसेच राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न झाली.