तब्बल 15 कोटी 58 लाख रु.चे विकास निधी मंजुर
विधानभवनात भेट घेवून खांडेंनी मानले मुख्यमंत्री शिंदेंचे आभार
मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून आणखी विकास निधी आणणार-कुंडलिक खाडे
बीड(प्रतिनिधी)शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील परळी पंचायत समिती, केज पंचायत समिती,गेवराई पंचायत समिती,पाटोदा पंचायत समिती,बीड पंचायत समिती,शिरुर कासार पंचायत समिती,अंबाजोगाई पंचायत समिती,आष्टी पंचायत समिती व माजलगाव पंचायत समिती या पंचायत समिती मधील फर्निचरसाठी तब्बल 15 कोटी 58 लाख रु.निधी उपलब्ध करुन घेतला आहे.त्यास दि.21 जुलै 2023 रोजी प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द असलेल्या जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शासकिय कार्यालय अत्याधुनिक व्हावीत यासाठी केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.जिल्हाप्रमुख खांडे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत.
पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा होय.पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाते. जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या नवीन इमारती उभ्या राहिल्या.या इमारतीमध्ये अत्याधुनिक आसन व्यवस्था,वेगवेगळी कार्यालये याची आवश्यकता आहे. ज्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांना तेथे आल्यानंतर सुटसुटीतपणे त्या त्या विभागाशी संपर्क साधता येवू शकतो. त्यासाठी नुतन फर्निचरची गरज ओळखुन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील पंचायत समितीसाठी निधी द्यावा अशी मागणी 12 सप्टेंबर 2022 रोजी केली होती. त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड जिल्ह्यातील शिरुर पंचायत समिती कार्यालयासाठी 1 कोटी 46 लाख, आष्टी पंचायत समिती कार्यालयासाठी 1 कोटी 43 लाख, पाटोदा पंचायत समितीसाठी 1 कोटी 46 लाख, बीड पंचायत समिती कार्यालयासाठी 2 कोटी 14 लाख, केज पंचायत समितीसाठी 1 कोटी 93 लाख, अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयासाठी 2 कोटी 10 लाख, परळी पंचायत समिती कार्यालयासाठी 1 कोटी 76 लाख, गेवराई पंचायत समिती कार्यालयासाठी 1 कोटी 64 लाख तर माजलगाव पंचायत समिती कार्यालयासाठी 1 कोटी 66 लाख रु.च्या विकास निधीची मागणी केली होती. जिल्ह्यासाठी तब्बल 15 कोटी 58 लाख रु.चा विकास निधी जिल्हाप्रमुख खांडे यांनी आणला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी वरील सर्व कामांना मान्यता देत निधी मंजुर केला आहे. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण पंचायत समिती विकास कामासाठी निधी आणू शकलो याचे मनस्वी समाधान वाटते अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली आहे.