एक दिवस साहेबांसाठी देण्याचा गावकऱ्यांनी केला संकल्प
बीड (प्रतिनिधी) दरवर्षी लोकनेते विनायकराव मेटे यांचा वाढदिवस त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरे करत असत मात्र स्व.मेटे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मावळ्यांना त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे. यात मागील दहा दिवसापासून जिल्ह्यासह राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात होते. या उपक्रमांना डॉ. ज्योती मेटे यांनी गावोगावी जात भेटी दिल्या याप्रसंगी त्यांनी लोकनेते विनायकराव मेटे यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम केले यावेळी गावोगावी स्वर्गीय मेटे साहेबांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यानी आपल्या लाडक्या लोकनेत्यांला स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी ३० जून रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे.
लोकनेते विनायकराव मेटे यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या सह विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर यापस्थित राहणार आहेत. दी. ३० जून शुक्रवार रोजी हा कार्यक्रम होणार आहे. स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी त्यांच्या हयातीमध्ये अनेक दिनदुबळ्या वंचित, शोषित,शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे आपल्या लोकनेत्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या मनात कायम सल आहे. त्यामुळे आपल्या नेत्याला अनोखी आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या जयंती मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार त्यांनी केला आहे
कार्यक्रमाची जय्यत तयारी; प्रशासनाचे नियोजन
शुक्रवारी होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून पाऊस काळ पाहता वॉटरप्रूफ शामियाना उभारण्यात आला आहे. आलेल्या वाहनांसाठी चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर उपस्थिततांना कसल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी आयोजकांच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. तर या कार्यक्रमाला मंत्र्याची हजेरी असल्याकारणाने प्रशासन देखील कामाला लागले असून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली आहे.