मान्सूनपूर्व स्वच्छतेकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष; मोठ्या नाल्यांची साफसफाई तात्काळ होणे गरजेचे
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : मान्सूनपूर्व स्वच्छता करण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिकेवर असते परंतु दरवर्षी बीड नगरपालिका ही छोट्या छोट्या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येवून शहरवासीयांची गैरसोय होते याकडे कोणी लक्ष देत नाही. यावर्षी सुद्धा परत बीड शहरातील रस्ते तुंबणार असून शहकरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कारण बीड शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचे मोठमोठे नाले अजूनसुद्धा स्वच्छ करण्यात आले नाही. हेच मोठमोठे नाले तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येते व वाहातुकीस खोळंबा होतो. घाण पाणी रस्त्यावर आल्याने रोगराई पसरते या सर्व बाबींचा विचार करून नगरपालिकेने यावर्षी तरी बीडकरांना दिलासा द्यावा व तात्काळ शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचे मोठमोठे नाले साफ करावेत अशी मागणी होत आहे.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवराज पान सेंटर, जालना रोड परिसर,, बार्शी नाका परिसर यासह सुभाष रोडपरिसर या महत्त्वाच्या ठिकाणची जरी मान्सूनपूर्व साफसफाइ केली तरीही या महत्त्वाच्या रस्त्यावर पावसाचे पाणी येणार नाही. यासह बीड शहरातील इतर भागातील सुद्धा नाल्यांची साफसफाई करून नगरपालिकेने बीडकरांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.