फोन करुनही तु का गाडी सोडत नाही म्हणून दिला दम
पोलिसाच्या फिर्यादीवरुन अंमळनेर पोलीस ठाण्यात पीएवर गुन्हा नोंद
प्रारंभ वृत्तसेवा
बीड । मी आमदार साहेबांचा पी.ए. बोलतोय असे सांगीतले तरी पण तु ट्रॅक्टर काय सोडले नाहीस त्याला ऑनलाईन दंड केला. तु आमदार साहेबांकडे चल, मी फोन करून सुध्दा ऐकत नाहीस. आमदार साहेबांपुढे उभा करतो असे म्हणून एका पोलिस कर्मचाऱ्याला आरेरावी करत शिवीगाळ केल्याची घटना घडली असून या प्रकरणी आमदाराच्या पीएवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पाटोदा तालुक्यातील अमळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले जालिंदर नाना बनसोडे (वय 36 वर्षे व्यवसाय नौकरी पोलीस अंमलदार बनं. 1684 रा. अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड) यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 25/04/2023 रोजी सकाळी 09:30 वाजण्याच्या दरम्यान मी व सोबत पोशि/231 घोंगडे असे मोटार वाहन केसेस करण्यासाठी पिंपळवंडी येथील माझ्या रूम वरून पोलीस स्टेशन येथे ट्राफिक अपडेट्स मिळवण्यासाठी गेलो होतोत. याच दरम्यान आष्टी मतदार संघाचे आमदार मा. बाळासाहेब आजबे त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले होते. त्या वेळी एक इसम माझ्याजवळ आला व मला म्हणाला की तु लोकांना का त्रास देतो असे म्हणुन माझी असलेली सरकारी मोटरसायकल ची चावी काढून घेतली व दि. 23/04/2023 रोजी पिंपळवंडी येथे गणेश हरीराम पवार यांचे ट्रक्टर पकडले होते तेव्हा मी ट्रक्टर सोडण्यासाठी फोन केला होता त्यावेळी मी सुनिल पारखे आमदार साहेबांचा पी.ए. बोलतोय असे सांगीतले तरी पण तु ट्राक्टर सोडले नाही. त्याला ऑनलाईन दंड केला असे म्हणुन तु आमदार साहेबाकडे चल मी फोन करून सुध्दा ऐकत नाहीस आमदार साहेबांपुढे उभा करतो असे म्हणुन मला आरेरावी भाषेत शिवीगाळ केली व तेथे जमलेल्या तीस ते चाळीस लोकांसमोर ट्राफीक च्या ड्रेसवर ड्युटीवर जात असताना अपमानस्पद वागनुक देवुन मला मी माझे सरकारी कर्तव्य करीत असताना जाणीवपूर्वक धाक दाखवुन दबाव आणुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणुन माझी सुनिल पारखे पुर्ण नाव पत्ता माहीत नाही. याचे विरुध्द फिर्याद आहे.