१९ चोरीच्या वाहनांची बीड मध्ये नोंद; तत्कालीन आरटीओसह एकावर गुन्हा नोंद
बीड आरटीओ मधील श्रीकृष्णाच्या कृष्णलीला
बोगस वाहनांची नोंद करणारे रॅकेट बीड मध्ये सक्रिय
या १९ वाहनांची किंमत ५.५ कोटीच्या घरात
(संग्रहित छायाचिञ)
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनागोंदी कारभार सुरू आहे. येथील अनेक प्रकार उघडकीस आले असून संबंधितांवर गुन्हे सुद्धा नोंद झालेली आहेत. 2017 मध्ये तत्कालीन आरटीओने चक्क परराज्यातील चोरीच्या वाहनांची नोंद केल्याचा प्रकार उघडकीस झाला असून आरटीओ विभागातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या फिर्यादीवरुन तत्कालीन आरटीओ सह एकावर गुरुवारी (ता. ०२) उशिरा फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. असल्या नालायक अधिकारी व दलालाल मुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे. गैरकामे करणार्या अधिकाऱ्यांवर व दलालावर कठोर कारवाई करत त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाची सखोल चौकशी करत त्यांनी कमावलेली माया जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली तर असे प्रकार परत घडणार नाहीत. विशेष म्हणजे कार्यालयातील मूळ कागदपञ सुद्धा नष्ट करण्यात आली आहेत.
2017 मध्ये तीन महिन्यासाठी अतिरिक्त पदभार आरटीओ श्रीकृष्ण नकाते यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी या तीन महिन्याच्या काळामध्ये मोठा अनागोंदी कारभार करत शासनाची मोठी फसवणूक केली परराज्यातील 19 वाहनांची बोगस नोंदणी केल्याचा प्रकार सध्याचे आरटीओ श्री माने यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्याच्या सूचना मोटार वाहन निरीक्षक संतोष रामदास पाटील यांना दिल्या होत्या. संतोष रामदास पाटील यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात श्रीकृष्ण नकाते यांच्यावर व अन्य एकावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये अजून ऑफिस मधील कोणी सहभागी आहे का? तसेच यात अजून कोणी दलाल आहे का? या अनुषंगाने बीड पोलीस काम करत आहे. लवकरच यामध्ये अजून काही जनांवर गुन्हे नोंद होणार आहैत. थोड्या पैशासाठी असले नालायक अधिकारी बीडमध्ये येतात व बीडचे नाव खराब करतात. गेल्या अनेक वर्षांपासून बीड आरटीओ विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. यामध्ये गेल्या काही वर्षात येथील भ्रष्ट दलालांवर गुन्हे सुद्धा नोंद झालेली आहेत. यासह मध्यंतरी एका वरिष्ठ लिपिकावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करत त्यांचे निलंबन सुद्धा करण्यात आले होते. हे प्रकारण ताजे असताना परत एक मोठे प्रकरण उघड झाले आहे. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी गैर कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व दलालांवर कठोर कारवाई करत त्यांनी कमावलेली माया जप्त करत यांना जेलमध्ये टाकण्याची गरज आहे. असे केल्यास परत असे गैर काम करण्याची धाडस कोणी करणार नाही.
असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणाचा हात?
सध्या परभणी येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्रीकृष्ण नकाते यांनी 2017 मध्ये बीडमध्ये मोठा घोटाळा केलेला आहे. यासह औरंगाबाद मध्ये सुद्धा 2020 मध्ये त्यांनी असेच कार्य केलेले आहे एवढे सर्व गुन्हे नकात्यांवर नोंद असताना, असल्या अधिकाऱ्यांना नेमका कोणाचा वरदहस्त असतो हेच समजत नाही. असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांनी केलेल्या नुकसानाची वसुली करत यांना नोकरीतून बडतर्फ करत जेलमध्ये टाकण्याची गरज आहे.
येथील भ्रष्ट दलालांना हद्दपार करण्याची गरज!
बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून काही भ्रष्ट दलाल काम करत आहेत. विशेष म्हणजे हे भ्रष्ट दलाल एवढे मोठे झाले आहेत की या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा चक्क धमक्या देत आहेत. येथील कारभार जर खरच सुधारायचा असेल तर असल्या भ्रष्ट दलालांना हद्दपार करण्याची गरज आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी विशेष लक्ष देत आरटीओ परिसरात चाललेला हा गैरप्रकार रोखण्याची गरज आहे.
नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेण्याची गरज!
येथील उपप्रादेशिक कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिक हे डोळे झाकून येथील एजंट वर विश्वास ठेवतात परंतु येथील काही एजंट भ्रष्ट असून हि भ्रष्ट मंडळी गैर कामे करत आहेत. भविष्यामध्ये यांच्या गैरकामामुळे तुम्ही सुद्धा अडकू शकतात. यामुळे तुमचे काम करताना एजंट चांगला आहे का? हे सुद्धा आपण पाहण्याची गरज आहे. या ठिकाणी आपले काम करताना नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.