सुरेश कुटे यांनी जगभरात बीडचे नाव उंचावले
त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष आढावा
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्यामध्ये ज्या जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून केली जाते. त्या जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. याच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षापासून उद्योजक क्षेत्रात यशस्वी भरारी घेणारे सुरेश कुटे यांनी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार दिला आहे. त्यांच्यामुळे आज हजारो युवक जिल्ह्यात स्थिरावले असून आर्थिक सक्षम होऊ लागले आहेत. सुरेश कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रारंभ परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा.
बीड जिल्हा हा विकासापासून कोसो दूर असलेला जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये विविध समस्या उद्भवल्या असून यात सर्वात मोठी समस्या म्हणजे रोजगाराची समस्या परंतु आलेल्या अडचणीला सामोरे जात त्या अडचणीवर मात करायचा व यश मिळवायचे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश कुटे. सुरेश कुटे यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर अत्यंत छोट्या व्यवसायातून त्यांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी भरारी घेतली. जगभरामध्ये बीडचं नाव करत त्यांनी त्यांचे वेगळी ओळख निर्माण केली आहे. बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून आजपर्यंत बीडची ओळख होती. परंतु आता उद्योग क्षेत्रात सुद्धा सुरेश कुटे यांनी बीडचं नाव उंचावलं आहे त्यांच्या भरीव योगदानामुळे बीड जिल्हा हा जगभरात ओळखला जाऊ लागला आहे. कोणत्याही मोठमोठ्या मीटिंग ह्या बीड जिल्ह्यात घेण्याचा आग्रह सुरेश कुटे व त्यांच्या टीमचा असतो. या उद्योग क्षेत्रामध्ये सुरेश कुटे यांना मोलाचं योगदान देणाऱ्या त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांचेही अनमोल योगदान बीड जिल्हाकारांसाठी आहे. बीड जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी अर्चना कुटे यांनी सुद्धा विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या योगदानामुळे आज बीड जिल्ह्यातील हजारो युवती स्वतःच्या पायावर उभे राहिल्या असून सक्षम होऊ लागले आहेत. कुटे दांपत्य बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून चांगलं काम करत असून उद्योग क्षेत्रासह सामाजिक कार्यात सुद्धा ते अग्रेसर असतात. त्यांच्या योगदानामुळेच आज बीड जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना काम मिळाले असून तो युवक वर्ग सक्षम होऊ लागला आहे.
सामाजिक कामात सुद्धा अग्रेसर असणारे कुटे दांपत्य
जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीने गरजूंना मदत करावी हा निसर्गाचा नियम आहे. याच अनुषंगाने कुटे दांपत्य हे गरजूंना मदत करताना दिसते. अतिवृष्टी झाली किंवा कुठे काही गरज लागली तर त्या ठिकाणी सर्वप्रथम कुटे परीवार मदतीचा हात देताना दिसतो. कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. याचवेळी कुटे ग्रुपने त्या गरजूंना किराणा किटचे वाटप करत त्यांना मोठा आधार दिला. यासह इतर कामातही कुटे ग्रुप गरजूंना आधार देतो त्यांच्या या आधारामुळे अनेकांना मोठी मदत होत आहे.