_________________________बीड ( प्रतिनिधी ) बीड मधील जिल्हा परिषदेच्या होत असलेल्या नवीन इमारतीच्या समोर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व नुतन जि.प. इमारतीचे भूमिपूजन सोबतच करावे . अशी मागणी बुलंद छावाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहीर यांनी केली आहे.
1 मे रोजी जिल्हा परिषद नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचा अध्यक्षांचा मानस असल्याचे समजते जर खरोखरच जिल्हा परिषद इमारतीचे उद्घाटन होत असेल तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पण उद्घाटन करावे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसवण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून होत आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव दि . 9/ 11 / 2017 रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला परंतु अद्याप छत्रपती संभाजी राजांचा पुतळा उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही जवळपास चार वर्ष होत आहेत इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आहे . परंतू पुतळ्याचे काय झाले ते समजत नाही चार वर्ष झाले तरी अद्याप पुतळा उभारला गेला नाही ही प्रक्रिया कुठे पर्यंत आली आहे पुढील प्रक्रियेचे काय झाले पुढील प्रक्रिया ताबडतोब करून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा त्याकडे अगोदर लक्ष द्यावे जिल्हा परिषदच्या प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी वेळोवेळी शंभू प्रेमींनी मागणी केलेली आहे तसेच दि . 6/ 2/ 2021 रोजी बीडचे पालकमंत्री मा.धनंजय मुंडे यांना निवेदन दिले होते परंतु अद्याप काय प्रक्रिया झाली आहे ते समजत नाही तरी दि . 1 मे रोजी नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्याचा अध्यक्षांचा मानस असल्याचे समजते जर खरोखरच उद्घाटन करण्याचे नियोजन असेल तर शंभूप्रेमींची मागणी लक्षात घेता छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे व नूतन इमारतीचे उद्घाटन सोबतच करावे असे आव्हान बुलंद छावा मराठा युवा परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहीर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.