क्रिडा महोत्सवातून राष्ट्रीय खेळाडू तयार होतील—प्रतापराव पंडित
गेवराई प्रतिनिधी : शारदा क्रिडा ॲकडमीचे संचालक रणवीर पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यात फार मोठी क्रिडाचळवळ उभी राहत असून जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या क्रिडा महोत्सवातून राष्ट्रीय खेळाडू तयार होतील आणि गेवराई तालुक्याचे नाव क्रिडा क्षेत्रात गौरवाने घेतले जाईल असा विश्वास दैठणचे सरपंच प्रताप भैय्या पंडित यांनी व्यक्त केला. क्रिडा महोत्सवात शारदा विद्या मंदिर दैठण येथे व्हालिबॉल स्पर्धेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित क्रिडा महोत्सवात आज मंगळवार दिनांक ६ डिसेंबर २२ रोजी तिसऱ्या दिवशी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन शारदा विद्या मंदिर दैठण येथे करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेचे उद्घाटक दैठणचे सरपंच प्रताप पंडित, उपसरपंच अजय पंडित, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पंडित, गजानन काळे, रामकिसन पंडित, बप्पासाहेब पंडित, रावसाहेब काळे,भाऊसाहेब माखले, अशोकराव पिंगळे नितीन पंडित, विक्रम नलभे, श्यामसुंदर शिंदे, बळीराम सुळे बाबुराव पंडित, हनुमान कोकणे, शिवाजी गोडबोले, लिंबाजी खोटे, भाऊसाहेब गोडबोले यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्पर्धा आयोजक रणवीर पंडित म्हणाले की, या क्रिडा महोत्सवातून आपल्या मातीतील खेळाडू येणाऱ्या काळात देशाचे प्रतिनिधित्व करतील असा मला विश्वास आहे. ग्रामीण भागातील मुले क्रीडा मैदानावर दिसावे हे माझे स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी शिवछत्र परिवार प्रयत्न करत आहे. या क्रीडा महोत्सवातून ग्रामीण भागात जनजागृती होईल आणि पुढील काळात चांगले खेळाडू तयार होतील. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे, यातून क्रिडा क्षेत्रात मोठे काम उभा राहील असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी गजानन काळे, भाऊसाहेब माखले यांनीही मनोगत व्यक्त करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून व सर्विस करुन करण्यात आला. या स्पर्धा दोन मैदानावर मुली आणि मुलांच्या गटात होत असून स्पर्धेत संस्थेचे चौतिस संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे पंच म्हणून अमित फुलारे, अभिषेक फुलारे, रोहित पांडे,सौरभ गायकवाड, रेवती सुतार हे काम पाहत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सय्यद युनूस यांनी केले. सुत्रसंचलन रामेश्वर दळवे यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारदा विद्यामंदिर दैठणचे मुख्याध्यापक सय्यद युनूस यांच्यासह ओम मोटे, भारत शिंदे, गणेश आतकरे, अंकुश राठोड, दिलीप चोपडे, अंकुश बन्सोडे,नारायण चाळक, विपीन वावरे, सुलभा खोटे, संदीप ढाकणे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, प्रा. काशिनाथ गोगुले यांच्यासह मुख्याध्यापक वसंत राठोड, मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे,किशोर पंडित, भक्तराज पौळ, अशोक तौर, भाऊसाहेब आडाळे, बाबुराव टकले, प्रा. सतिश चव्हाण, गंगाधर बोर्डे, दत्तात्रय देशपांडे, रणजित सानप, गायकवाड के.एन. डी फार्मसीचे प्रा. संतोष टाक, गजानन मोटे, यांच्यासह सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थी, क्रिडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचलन पथसंचन ठरले आकर्षण
कार्यक्रमात जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले पथसंचन प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी क्रिडा ध्वजारोहण करण्यात आले.