पाच जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : शेळीपालन व्यवसायाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.
रत्नप्रभा भ्र.प्रमोद परळीकर (वय 25, व्यवसाय घरकाम व शेती) यांची व इतरांची शेळीपालन व्यवसायासाठी लागणारे 100 शेळीचे पिल्ले, एक पत्र्याचे शेड, अडीच एक्कर जागा, चार-दोन कामगार व रोख रक्कम 25 हजार रुपये महिना देतो असे आमिष दाखवून परळीकर यांचे व त्यांच्यासह इतरांची प्रत्येकी अडीच लाख असे एकूण साडेबारा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी मॅनेजिंग डायरेक्टर अजितकुमार हिरवे (रा.आदर्श मराठी प्राथमिक शाळा, साईमंदीर जवळ) कोडोली परिसर सातारा, भागवत भगवान तांदळे, रा.मु.पो.चोरपांगरा ता.लोणार जि.बुलढाणा, सुधाकर रत्नाकर मुंडे रा.गंगाखेड, बाबुराव साहेबराव मुळे रा.महातपुरी ता.गंगाखेड जि.परभणी, सुर्यकांत इंद्रजित गुट्टे, रा.गंगाखेड जि.परभणी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.