बीड । प्रतिनिधी : शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाल्यानंतर शहर पोलीसांनी त्याठिकाणी धाड टाकून तिर्रट खेळणाऱ्या सात जणांना रंगेहात पकडले. शहरात करण्यात आलेल्या दोन कारवाईत 72 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवि सानप यांची टिम गेल्या काही महिन्यांपासून बीड शहरात चांगल्या कारवाया करत असल्यामुळे गुन्हेगारीला आळा बसत आहे.
शहरातील भीमनगर भागात गेल्या काही दिवसापासून तिर्रट नावाचा जुगार खुलेआमपणे सुरु असल्याची माहिती बीड शहर पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक रवि सानप यांना मिळाली. त्यांनी तात्काळ त्यांच्या टिमला आदेशित करुन जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यास पाठवले.
बीड शहर पोलीस ठाण्याचे पोउपनि गायकवाड, मनोज परजने,सिरसाट, डोके,सय्यद, पवार, सानप यांच्या टिमने भीमनगर भागातील सदरील
जुगार अड्ड्यावर छापा टाकत अजिंक्य मधुकर वडमारे, भुषण युवराज वडमारे, सुरज बापु वाघमारे,लखन प्रभु वडमारे, विकास सुरेश
जोगदंड, बाळू आश्रुबा सोनवणे, निखील बबन भालेराव यांना तिर्रट खेळताना अटक केली. त्यांच्याकडून 58 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच शहरातील जुन्या भाजी मंडईतील पिंगळे गल्लीसमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाईन चक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकत सचिन अंबादास काळे याला अटक करण्यात आली
आहे.पो.नि.रवि सानप यांनी अवैध धंद्या विरुध्द जोरदार मोहिम उघडल्यामुळे काळे कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.