-सर्वसामान्य नागरीक व पोलीसांमधील दरी होतेय कमी
-पोलीस अधीक्षक जाणून घेतायेत सर्वसामान्यांच्या अडचणी
-जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना वेळोवेळी योग्य त्या सुचना
-थेट नागरीकांशी संवाद असल्यामुळे तळागळातील समस्यांची जाण
-अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाचे कौतुकच
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर बीड जिल्ह्यात येण्यापुर्वी प्रचंड प्रमाणात पोलीस विभागाची बदनामी झाली होती. अधीवेशनात तत्कालीन पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या कामकाजावर आवाज उठवल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक म्हणून नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक आव्हाने होती. परंतू त्यांनी यासर्व परस्थितीचा सविस्तर अभ्यास करुन जिल्ह्यात काम करण्यास सुरुवात केली. गणेश व नवरात्र उत्सवात त्यांनी थेट जनतेमध्ये जाऊन उत्साहात सहभाग घेतला. यामुळे नागरीक व पोलीसांमधील दरी कमी होण्यास मदत मिळाली. नागरीकांशी संवाद कायम ठेवल्यामुळे जिल्ह्यात सर्वच उत्सव उत्साहात व शांतेत पार पाडले. यासह जिल्ह्यात क्राईम कमी करण्यासाठी सुद्धा त्यांनी विशेष प्रयत्न केले, वेळोवेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सर्व सामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यास सुचना केल्या. पोलीस अधीक्षक नागरीकांंना भेटण्यासाठी वेळ देत असल्यामुळे तक्रारदार यांचा पोलीसांबाबतचा विश्वास वाढला. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात पोलीस प्रशासनाची मलीन झालेली प्रतिमा बऱ्यापैकी उंचावली आहे. यापुढे सुद्धा ठाकूर यांच्या अनुभवाचा बीडकरांना फायदा होईल असे चित्र आहे.
बीड जिल्ह्यात येण्यापुर्वी अधिकाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झालेले असतात. जिल्ह्यात येण्यास काही अधिकारी टाळाटाळ करतात. परंतू जिल्ह्यात आल्यानंतर मात्र त्यांना येथील सर्वसामान्य नागरीक किती प्रेमळ आहेत याची जाणिव झाल्या शिवाय राहत नाहीत. जो अधिकारी जिल्ह्यात चांगले काम करेल, त्या अधिकाऱ्याला बीडकर डोक्यावर घेतल्याशिवाय सुद्धा राहत नाहीत. बीड मध्ये पोलीस अधीक्षक म्हणून नंदकुमार ठाकूर यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात सकारात्मक काम करण्यास सुरुवात केली. पोलीस विभागात काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव जिल्ह्यात कामास येत आहे. बीड जिल्हा विकासापासून कोसोदूर असल्यामुळे जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. यामुळे जिल्ह्यात क्राईम सुद्धा जास्त प्रमाणात असतो. बीड जिल्ह्यात काम करताना अधिकाऱ्यांना अनेक बाबींचा विचार करुन येथे काम करावे लागते. पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना नंदकुमार ठाकूर यांनी सर्व सामान्य नागरीकांना येणाऱ्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. यासह पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीस वेळ देत त्यांच्या अडचणी जाणून त्या मार्गी लावण्यासाठी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलणे व सुचना करणे यामुळे सर्व सामान्यांची भावना वर्दी विषयी वाढत आहे. पोलीस अधीक्षक यांची भेट झाल्यानंतर त्या तक्रारदाराहचे प्रश्न सुटतातच, जिल्ह्यातील सामाजिक कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम, त्याठिकाणी उपस्थित राहण्यासाठी पोलीस अधीक्षक नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे जिल्ह्यात मलीन झालेली पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावत आहे.
पोलीस अधीक्षकांची या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज
-जिल्ह्यातील काही ठाणेदार अजून सुद्धा तक्रारदाराशी व्यवस्थित बोलत नाहीत
-जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांना चोप देण्याची गरज
-शहरातील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावणे गरजेचे
-शहरातील सिग्नल सुरु करण्याची गरज
-अनेक पोलीस चौकीवर कर्मचारी उपस्थित नसणे
-ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी जनजागृतीची गरज
-वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष पुढाकार घेण्याची गरज