केज/ प्रतिनिधी
श्री आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि जी एम आझाद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्ताने फुलेनगर भागातील ज्ञान प्रबोधिनी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक केज नगरीच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई प्रदीप बनसोड तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक जलालभाई इनामदार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार एकबाल शेख, श्री आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तात्या गवळी, सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख, अमर हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर जयंती
उत्सव कमिटीच्या वतीने मान्यवराचे आणी ज्ञान प्रबोधिनी प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जयंती उत्सव कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ज्ञान प्रबोधिनी प्राथमिक विद्यामंदिर यांच्यावतीने केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई प्रदीप बनसोड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
श्री आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणी जी एम आझाद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक डी. ए. देशमुख सर, सहशिक्षक जी. बी. राहणे सर, जाधव सर, राऊत सर, चाळक सर, थोरात सर, कुलकर्णी मॅडम, बडे मॅडम, अशोक धिवार, अमेर पटेल, फैसल पटेल, पवन बनसोड, विवेक बनसोड, अफरोज शेख, मोहसीन शेख, आसेफ शेख यांच्यासह जयंती कमिटीचे अध्यक्ष अरबाज भाई, उपाध्यक्ष पप्पू पटेल, जी एम आझाद ग्रुपचे अध्यक्ष शाहरुख पटेल, उपाध्यक्ष एजाज भाई व फुलेनगर, आझाद नगर भागातील नागरिक आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.