ज्यांनी बीडला रेल्वे यावी यासाठी लढा दिला त्यांचे योगदान मोलाचेच
उद्या होणार्या नगर आष्टी रेल्वे शुभारंभासाठी फक्त व्हिआयपींना निमंञण
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात रेल्वे यावी यासाठी अनेकांनी मोठे योगदान दिलेले आहे. यामध्ये स्वातंत्र्य सैनिक, स्व. केसर काकू क्षीरसागर, स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांचे मोठे योगदान आहे. तसेच ज्यांनी रेल्वेसाठी जेल भरो आंदोलन केले ते स्व. अमोल गलधर यांनी तर रेल्वेसाठी मोठे आंदोलन छेडले होते. त्यांच्या सोबत अनेक युवकांनी यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. परंतु या सर्वांचे योगदान उद्याच्या कार्यक्रमाचे आयोजक विसरले असल्याचे चिञ आहे.
बीड जिल्हा हा विकासापासून कोसो दूर असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अनमोल योगदान दिलेले आहे. सुरुवातीच्या काळात खासदार केसर काकू यांनी सुद्धा बीडला रेल्वे आणण्यासाठी मोठा पुढाकार घेतला होता तसेच
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा रेल्वे यावी यासाठी मोठे प्रयत्न केले होते. स्व. अमोल गलधर यांनी तर बीडला रेल्वे यावी यासाठी मोठा लढा उभा केला, यात अनेकांवर गुन्हे नोंद झाले तरीही हे वाघ मागे फिरले नाहीत. त्यांच्या या लढ्यामुळे आज बीडला रेल्वे येत आहे. परंतु या सर्वांचा विसर आयोजकांना पडल्याचे उद्याच्या कार्यक्रम नियोजनातुन दिसत आहे. त्या सर्वांनाच उद्या होणाऱ्या उद्घाटनापासून का दूर ठेवण्यात आले हा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रेल्वे उद्घाटनावर अनेक संघटनांनी बहिष्कार टाकला आहे.