मातोश्री व माजी आमदार स्व.विनायक मेटे यांच्या निधनाचा दुखवटा
बीड प्रतिनिधी : काही महीन्यांपूर्वीच आ.संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री स्व.रेखाताई क्षीरसागर यांचे दुखःद निधन झाले. तर काही दिवसांपूर्वी माजी आमदार स्व.विनायक मेटे साहेबांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले आहे.या दोन्ही घटनांमुळे वैयक्तिक पातळीवर मोठे दुःख झाले असल्याने यावर्षी 27 ऑगस्ट रोजी माझा जन्मदिवस साजरा करू नये असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी सर्व कार्यकर्ते व स्नेही यांना केले आहे.
मागील एप्रिल महिन्यामध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री स्व.रेखाताई क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.हे डोंगराएवढे मोठे दुःख समोर असतानाच,दहा दिवसांपूर्वी समाजकारणात व मराठा आरक्षण प्रश्नी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या माजी आमदार स्व.विनायक मेटे साहेब यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले.माजी आमदार स्व.विनायक मेटे यांचे आणि माझे अगदी जवळचे व स्नेहाचे संबंध होते.त्यांच्या जाण्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे व समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.या दोन्ही अत्यंत दुःखद घटना घडल्यामुळे मी,माझा जन्मदिवस साजरा न करण्याच्या निर्णय घेतला असून माझ्या पक्षाचे, मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते व स्नेहींना विनंती आहे की,कृपया करून बॅनर,जाहीराती,सोशल मीडिया आदी कोणत्याच माध्यमातून जन्मदिवस साजरा करू नये.असे आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.