बीड, : असं म्हणतात मैत्री ही कितीही संकट आले कितीही कालावधी लोटला तरी नातं मात्र ठेवून असते असाच अनुभव बीड शहरातील चंपावती विद्यालयातील 1980 च्या दशकात दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकिञ येत दाखवून दिले. नुकताच शाळेमध्ये गेट टुगेदर चा कार्यक्रम झाला यावेळी 41 वर्षापूर्वीचे मित्र मैत्रिणी पुन्हा एकत्र येऊन दिवसभर शाळेमध्ये रणमान झाले होते.
शहरातील नामांकित असलेल्या चंपावती शाळेमध्ये 1980 -81 च्या दशकात दहावी मध्ये शिक्षण घेतलेल्या सर्व वर्ग मित्रांनी एकत्र येण्याचे ठरविले, यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या परिचित असलेल्या मित्र-मैत्रिणींना संपर्क साधून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला शाळेमध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला सर्वांनी बीड शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडेश्वरी मातेचे दर्शन घेऊन आपल्या शाळेमध्ये दाखल झाले, 41 वर्षानंतर भेटलेल्या या मित्र-मैत्रिणींच्या चेहऱ्यावर पुन्हा बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या, कोणी पुणे, मुंबई ,औरंगाबाद तर काहीजण परराज्यातही सध्या आपल्या कामानिमित्त वास्तव्यात होते मात्र या कार्यक्रमासाठी हे सर्वजण आवर्जून उपस्थित होते. त्यांना शिकविणाऱ्या गुरुजनांना वंदन करून शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले, दिवसभर अतिशय उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. गुरुजनांन प्रति असलेली श्रद्धा कायम ठेवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शाळेमधील गंमती जमती आणि सध्या जीवनात सुरू असलेले चढ उतार आम्ही शाळेतून मिळालेले या सर्व गोष्टींचा मनमोकळ्या स्वरूपात उपस्थित विद्यार्थ्यांनी बोलून दाखवल्या. यावेळी यावेळी आचार्य सर, देशमुख सर, डी. एस. कुलकर्णी सर, कौंडण्य सर, गोडसे ताई तसेच शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम आवर्जून उपस्थित होते. जे वर्गमित्र आज आपल्या मध्ये नाहीत अशा मित्रांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर ज्या शाळेतून आपण शिक्षण घेतले त्या शाळेला भेटवस्ते देण्यात आल्या. दिवसभर अतिशय उत्साही वातावरणात पार पडला आणि पुन्हा भेटी घेण्याचे आश्वासन देऊन प्रत्येककाने जड अंतकरणाने निरोप घेतला.