मुंबई प्रतिनिधी : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांना या पदावरून हटवण्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे. त्यांच्याबद्दल बोलणं गैर आहे. पण राज्यपाल सातत्यानं महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहेत. विविधतेत एकात्मता ही भारताची ओळख आहे. मात्र, समाजामध्ये तेढ करण्याचे कटकारस्थान राज्यपाल सातत्याने करत आहेत. महाराष्ट्रात मीठाचा खडा टाकून कटुता वाढवायचा हा प्रकार आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहेत. तसेच संसदेत याविषयी आवाज उठवणार असल्याचेही त्या म्हणाल्या.