जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थित आरक्षण सोडत
एससी आठ, एसटी एक, ओबीसी १८, खुल्या २१
बीड : जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज (ता. २८) जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित जिल्हा परिषदेच्या ६९ जागांसाठी आरक्षण सोडत झाली. यात एससी आठ, एसटी एक, ओबीसी आठरा तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच्या २१ जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत. नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत मध्ये ओबीसी आरक्षण नसले तरी जिल्हा परीषद व महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण मिळणार आहे.
पुढील प्रमाणे आरक्षीत गट
एससी: उमापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. त्यापैकी उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर, किट्टीआडगाव हे पाच गट एससी महिलांसाठी राखीव झाले. एसटी: जिरेवाडी
ओबीसी: रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे. यापैकी रेवकी, बीड सांगवी, तलवाडा, मातोरी, डोंगरकिन्ही, नाळवंडी, पाडळसिंगी, पिंप्री, जोगाईवाडी हे ९ गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत.
सर्वसाधारण महिला:
ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी, टाकरवण, धोंडराई, दाऊतपुर, घाटनांदूर, वीडा, राजुरी, बहिरवाडी, नागापुर या गटांचा समावेश आहे.