श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा 53 वे वर्ष आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायी वारीची परंपरा कायम ठेवली. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांपासून पायी वारीमध्ये खंड पडला होता. शेगाव येथील मंदिरातून 6 जून रोजी प्रस्थान झालेली ही दिंडीचा प्रवास 33 दिवसात 750 किमी चालत वाटेत लागणाऱ्या नऊ जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होते. वापसचा प्रवास सुद्धा पायीच असतो. श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेतवस्त्रधारी 700 वारकरी ,वाहन,घोडे , बँड पथक आदी वाद्यसह शिस्तबद्ध रांगा अशी तीर्थक्षेत्र पंढरपुर ते बीड पायी चालत प्रवास करीत आज पालखी बीडशहरात आली, यावेळी पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरात प्रवेश होताच भक्तिमय वातावरणात हा परिसर हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेला होता. बीड शहरात ठिक-ठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. आज पालखीचा बीड शहरातील कंकाळेश्वर याठिकाणी मुक्काम असणार आहेत.