एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात ईडीकडून कारवाई
प्रारंभ वृत्तसेवा
मुंबई: माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पांडेंना बेड्या ठोकल्या आहेत. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात पांडेंवर कारवाई करण्यात आली आहे. 2009 ते 2017 या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. 5 जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडेंची ईडीने चौकशी केली होती.
संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलीस खात्यातून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही आयटी कंपनी सुरु केली होती. 2006 मध्ये पांडे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले, त्यावेळी त्यांनी आपली आई आणि मुलाला कंपनीचे संचालक केले. पांडेंच्या कंपनीला एनएसईचे सर्व्हर, संगणकीय यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान वापरण्यात आले. चित्रा रामकृष्ण यांच्या काळात झालेला एनएसईतील गैरव्यवहार लेखापरीक्षणात का उघड झाला नाही, याची चौकशी करण्यात आली