मोदी सरकारने देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची चेष्टा करू नये – गणेश बजगुडे पाटील
बीड / अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांना चिरडण्याचे काम केले व आता अग्निपथच्या नावाने कंत्राटी पद्धतीने चार वर्षासाठी सैन्यभरती करून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाच्या भवना भरडण्याचे काम करत आहे. मोदींनी चेष्टा केल्याप्रमाने तरुणाच्या स्वप्नांचा खेळ मांडला असून काँग्रेस पक्ष नेहमीच देशातील शेतकऱ्यांच्या आणि जवानाच्या बाजूने असुन भाजप सरकारचा हा कुटील डाव हाणुन पडल्याशिवाय काँग्रेस पार्टी शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी दिली.
चार वर्ष सेवा म्हणजे देशाच्या सुरक्षेशी केलेली तडजोड असुन चार देशाची सेवा करून जवानांना ऐन उमेदीत वाऱ्यावर सोडणे कितपत योग्य आहे. हा विचार केंद्रातील सरकारने करावा व अग्निपथ या गोंडस नावाखाली कंत्राटी लष्कर भरती निर्णय तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस बीड तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी बीड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश डरपे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष हनुमान घोडके, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेरणा सुर्यवंशी, अल्पसंख्यांक शेख बबलु भाई, उमेश डमरे, कृष्णा साळुंके, शेख आमेर, सिराज पटेल, विशाल डाके, अशोक रूपणर, महादेव साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.