प्रारंभ न्युज
बीड : पावसाळ्यात फोनमध्ये किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये पाणी गेल्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कितीही उपकरणांची काळजी घेतली तरी ती पावसाच्या पाण्यात आपल्याकडून भिजली जातात अशावेळी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया.
खूप जास्त पाऊस येत असेल तेव्हा आपण आपला फोन बंद ठेवायला हवे. फोन चालू असल्यामुळे त्यात पाणी जाऊन त्याच्या आतील सर्किट्सचे नुकसान होते त्यामुळे अशावेळी त्वरीत फोन बंद करावा.
इअरफोनचा अतिवापर आरोग्यास ठरेल घातक !
२. पावसाळ्यात (Monsoon) काळजी घेऊन सुध्दा आपला फोन (Phone) पावसात भिजला असेल तर त्याला स्वच्छ व कोरड्या कापडाने पुसून घ्या. यानंतर बॅटरी किंवा सिम कार्ड काढून टिश्यू पेपरने स्वच्छ करा. घरी असाल तर फोनला २४ तास तांदळात ठेवा आणि बाहेर असाल तर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा. हे फोनमधील अतिरिक्त मॉइश्चरायझर शोषून घेण्याचे काम करते.
३. आपल्यापैकी बऱ्याच जणांना काम करताना फोन वापरण्याची सवय असते. काम करताना फोन पाण्यात पडल्यानंतर हेअर ड्रायरने वाळवण्याची चूक करू नका. यासाठी कच्चे तांदूळ, ब्लॉटिंग पेपर किंवा सूर्यप्रकाश हा पर्याय उत्तम असेल. फोन थोडा फार सुकल्यानंतर त्याला उघडून ठेवा. एका तासापेक्षा जास्त काळ फोनला उन्हात ठेवू नका. असे केल्याने स्मार्टफोनचे प्लास्टिकचे भाग खराब होऊ शकतात.
४. फोन ओला झाल्यानंतर त्याला लगेच चार्जिंगला लावू नका त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते ज्यामुळे आपला फोन खराब होण्याची शक्यता वाढू शकते. तसेच पाण्यात भिजल्याने स्मार्टफोन नीट काम करत नाही असे वाटत असेल तर लगेच सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन त्याची तपासणी करून घ्या.