संबंधित गुत्तेदाराला काम करायचे नसेल तर दुसरा गुत्तेदार द्या
वाहतुक शाखा फक्त नावालाच उरली
अत्याधुनिक मशिन फक्त दाखवण्यासाठीच का?प्रारंभ वृत्तसेवाबीड : शहरातुन जाणारा धुळे- सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग प्रंचड प्रमाणात खराब झाला होता. यामुळे वाहनधारकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. यानंतर कुठे या रस्त्यासाठी 18 कोटीची निधी मंजूर करण्यात आला असून काकू-नाना हॉस्पिटल ते सोमेश्वर मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता होत आहे. परंतू हे काम संथ गतिने सुरु असल्यामुळे शहरातील वाहनधारकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोजच शहरातील नागरीकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरात वाहतुक कोंडी होऊ नये ही वाहतुक शाखेची जबाबदारी आहे. परंतु गेल्य काही महिन्यापासून वाहतुक शाखेचे नियोजन शुन्य कारभार दिसत आहे. त्यात ज्या गुत्तेदाराकडे ह्या रस्त्याचे काम आहे, त्यांना हे काम वेळेवर करायचे नाही असेच दिसत आहे. यासर्व कारभारमुळे गेल्या काही महिन्यापासून बीडकरांना वाहतुक कोंडीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.
बीड शहरातुन जाणारा धुळे-सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही महिन्यापासून प्रचंड खराब झाला होता. यात जालना रोड, बार्शी रोडवर मोठ्या प्रमाणात मोठ-मोठे खड्डे पडले होते. यामुळे वाहनधारकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करुन विशेष निधी मंजूर करुन आणला होता. सध्या या रस्त्याचे काम पण सुरु आहे. परंतु अनेक ठिकाणी अर्धवट काम, काही ठिकाणी काम सुरु, विविध भागातील रस्ते मुख्य रस्त्याला न जोडल्यामुळे नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात जे काम सुरु आहे ते खुपच संथ गतिने सुरु आहे. यामुळे संबंधित विभागाला हे काम पुर्ण करण्यासाठी अजून किती महिने लावायचे आहे हे मात्र समजत नाही. तसेच शहरात होणारी वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी वाहतुक शाखेच्या वतिने विशेष असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. यामुळे बीड शहरातील वाहतुक कोंडीमुळे भर उन्हात वाहनधारकांना उभे राहण्याची वेळ आली आहे. यामुळे शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
आमदार साहेब वाहतुक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त
शहरातील जालना रोड, बार्शी रोड, सुभाष रोड परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून याचा त्रास नागरीकांना जास्त सहन करावा लागत आहे. यामुळे आमदार साहेब शहरात सुरु असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम गतिमान करण्यासाठी आपण विशेष लक्ष द्यावे म्हणजे शहरातील नागरीकांची या वाहतुक कोंडीतुन सुटका होईल.