कोल्हापुर : “शक्ती कायदा हा केवळ दिखावा आहे. जर शक्ती कायद्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र सरकारने जर काही केलं असतं तर सर्वात आधी धनंजय मुंडेंना तुरुंगात टाकलं असतं. त्यानंतर संजय राठोड यांना तुरुंगात टाकलं असतं. पण या लोकांवर साधा एफआयआर देखील पोलिसांनी दाखल केलेला नाही,” असे मत करुणा शर्मा यांनी कोल्हापुर येथे सोमवारी (ता. 14) व्यक्त केले.
यावेळी करुणा शर्मा यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. सोमवारी कोल्हापुरात बोलताना करुणा शर्मा यांनी आपला शिवशक्ती पक्ष आता कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.