–दोन्ही तलाव भरलेले असताना 15 दिवसाला पाणी
–लाईटचे बिल भरण्यासाठी नगर पालिकेकडे पैसे नाहीत
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत मध्ये जिल्ह्यात भाजपाला चांगले यश मिळाल्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणूकांच्या अनुषंगाने भाजपाने कंबर कसल्याचे दिसत आहे. बीड नगर परिषदची निवडणूक भाजपा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. यासह शहरातील विकासाठी 600 कोटीचा विकास निधी भाजपाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. परंतु याचे श्रेय दोन्ही क्षीरसागर घेताना दिसत अल्याचे मत सुद्धा यावेळी मस्के यांनी व्यक्त केले.
भाजपाच्या वतिने आज बीड शहरातील भाजपा कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजापाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, भाजपा अल्पसंख्यायक प्रेदश उपाध्यक्ष सलीम जहांगीर, भाजपा उपजिल्हाध्यक्ष नवनाथ शिराळे, भाजपा शहराध्यक्ष भगिरथ बियाणी यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या निवडणूकांच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरात विविध योजनांसाठी भाजापाने केलेल्या पाठपुराव्यामुळे मोठा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु दोन्ही क्षीरसागरांच्या वादात शहरात सर्वत्र घाणीचे सम्राज्य निर्माण झाले असून दोन्ही तलावात पाणी असून सुद्धा शहरकरांना 15 दिवसाला पाणी मिळत आहे. यामुळे नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येणाऱ्या नगर परिषद निवडणूकीत भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार असून त्या अनुषंगाने तयारी सुरु असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.