उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
बीडला असताना वक्फ बोर्डकडे तक्रार करण्यात आली होती
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व सध्या अकोला येथे कार्यरत असलेले जी श्रीधर यांना ईडीची नोटीस प्राप्त झाली असून मुंबई येथील ईडी कार्यालयात उद्या हजर राहण्याचे आदेश आहेत. त्यांच्या विरोधात बीडला कार्यरत असताना त्यांची वक्फ बोर्डकडे तक्रार करण्यात आली होती. याच अनुषंगाने त्यांना बोलावले असल्याची माहिती प्राप्त होत आहे. प्रारंभने SP जी श्रीधर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की नोटीस प्राप्त झाली आहे. परंतु कोणत्या प्रकरणाची नोटीस आहे हे माञ त्यांनी सांगितले नाही.
बीड जिल्ह्यात सध्या जमीन देवस्थान प्रकरण चांगलेच राज्यात गाजत आहे. ज्यांनी ज्यांनी देवस्थान जमीन घोटाळ्यात सहभाग घेतला आहे, ते माञा आता यात अडकण्याची शक्यता आहे. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी व तत्कालीन पोलीस अधिक्षक यांची वक्फ बोर्डकडे तक्रार करण्यात आली होती, याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आता तत्कालीन पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांची पण चौकशी होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. परंतु जी श्रीधर यांना संपर्क केला असता त्यांनी नोटीस प्राप्त झाल्याचे सांगितले पण नेमके कोणते प्रकरण आहे, याची माहिती माञ मिळू शकली नाही. त्यांना प्राप्त झालेल्या नोटीस मध्ये १७ डिसेंबर ला म्हणजे उद्याच मुंबई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश आहेत.