बीड : एसटी कर्मचाऱ्यांना कमी पगार यासह इतर अडचणींमुळे राज्यातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. यासर्व समस्यांमुळे गेल्या पाच दिवसापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे. पाचवा दिवस आज असला तरी एसटी कर्मचारी संपावर कायम आहे. त्यात रविवारी संध्याकाळी येथील एका कर्मचाऱ्याने विष घेतल्याची घटना घडली आहे. यामुळे हा संप अजून सुरुच राहणार असल्याचे दिसत आहे. संपामुळे मात्र प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यात खासगी वाहनचालक मनमानी करताना दिसत आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी आता मुख्यमंत्री यांनीच काही तरी तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिवसेंदिवस वाढत चालेली महागाई त्यात एसटी कर्मचाऱ्यांचा कमी पगार, यात घर कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण यासह इतर गरजा कशा पुर्ण करायच्या यासह इतर समस्या सध्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसमोर उभ्या आहेत. यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून आज संपाचा पाचवा दिवस आहे. परंतु आज पर्यंत राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याच मागण्या पुर्ण करण्यात आलेल्या नसल्यामुळे हा संप सुरुच राहणार असल्याचे दिसत आहेत. राज्यातील प्रवाशांना मात्र या संपामुळे विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे.