शेतकऱ्यांच्या व्यथा जाण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा थेट बांधावर
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्हा हा खुप मयाळू असणार जिल्हा आहे म्हणून ओळख आहे. तसेच जशाला तसेच उत्तर देणार जिल्हा म्हणून सुद्धा बीड जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात एखादा अधिकारी चांगले काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला हा जिल्हा डोक्यावर घेतल्या शिवाय राहत नाही. पुर्वी जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून सुनिल केेंद्रेकरांनी खुप चांगले काम केलेले आहे. यावेळी जिल्ह्यातील नागरीकांनी त्यांची बदली झाल्यानंतर आक्रमक होत बदलीला विरोध सुद्धा केला होता. सध्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून राधाबिनोद शर्मा आलेले आहेत. अजून ते कसे आहेत हे बीडकरांना समजलेले नाही. परंतु काल त्यांनी गेवराई तालुक्यात पडत्या पावसात दुचाकीवर अनेक गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. यामुळे खुप दिवसांनी जिल्ह्याला चांगला अधिकारी आल्याची भावना सर्वसामन्यांमध्ये निर्माण झाली आहे. परंतू अजून जिल्ह्यात खुप समस्या आहेत. त्या समस्या सध्या जिल्हाधिकारी कसे मार्गी लावतात हे पाहणे सुद्धा गरजेचे ठरणार आहे.
बीड जिल्हा हा मुळात विकासापासून खुप मागे असणार जिल्हा आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास करण्याची गरज आहे. यात महत्वाची भुमिका जिल्हाधिकारी यांची सुद्धा राहणार आहे. यामुळे जिल्ह्याला चांगला अधिकारी असे गरजे होते. अनेक वेळा जिल्ह्यात चांगले अधिकारी आलेले सुद्धा आहेत. परंतु त्यांना येथील नेत्यांनी चांगले काम करुन दिलेले नाही. जो अधिकारी जिल्ह्यात चांगले कामे करतो, त्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात जास्त दिवस राहू दिले जात नाही. हा जिल्ह्याचा इतिहास आहे. सध्या जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून राधाबिनोद शर्मा हे अधिकारी मिळालेले आहे. अजून तरी ते कसे आहेत किंवा ते कसे काम करतात हे जास्त पाहता आलेले नाही. परंतु काल त्यांनी गेवराई तालुक्यातील अनेक गावांना भेटी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचे वाहन जात नव्हते त्या ठिकाणी ते दुचाकीवरुन गेल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना पण दिलेले आहेत. कालच्या त्यांच्या कामावरुन तर ते चांगले काम करतील अशी आशा जिल्ह्यातील नागरीकांना आहे परंतु येणारा कालच ंठरवले की ते कसे काम करतात व जिल्ह्याला विकासाच्या शिखरावर नेतात का? पुर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यां सारखेच काम करतात. सध्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या कडून बीडकरांना मोठ्या अपेक्षा आहेत.