-मुंबई उच्च न्यायलायाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आदेश
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात 2011 ते 2019 मध्ये नरेगामध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले होते. परंतु यात म्हणावी तशी चौकशी करण्यात आली नाही. आदेश देऊनही पारदर्शी चौकशी न करत न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची तातडीने बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत.
नरेगामध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने सविस्तर अहवाल तयार करुन तो अहवाल सादर करायचा होता. परंतु यात दिरंगाई करण्यात आली. यासह म्हणावी अशी चौकशी सुद्धा करण्यात आली नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन न करत न्यायालयाचा अवमान करण्यात आला यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने चक्का जिल्हाधिकारी यांची बदली करुन नव्या जिल्हाधिकारी यांची तात्काळ नियुक्ती करण्याचे आदेश दिले. पुढील सुचना नव्या जिल्हाधिकारी यांना करण्यात येथील असे सुद्धा यात नमुद करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या बदलीचे जे आदेश निघाले आहे तसे आदेश निघण्याची राज्यात पहिलीच वेळ आहे.नेत्यांनो आता तरी जिल्ह्यात चांगले अधिकारी आणा!
बीड जिल्ह्यात मुळात चांगले अधिकारी येत नाहीत आले तरी, येथील काही नेते मंडळी त्या अधिकाऱ्यांना जास्त दिवस राहु देत नाहीत. जिल्ह्यातील नेते त्यांच्या सोयीनुसार जिल्ह्यात भ्रष्ट अधिकारी आणत असतात. यामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात विकासाचा वेग मंदावला आहे. आता तरी जिल्ह्यात चांगले अधिकारी आणा व जिल्ह्याचा विकास गतिने करा. जी जनता तुम्हाला मोठ्या आशेने मतदान करते, तुम्हाला सत्तेत बसवते याचे तरी भान ठेवा. जे अधिकारी बीडच्या फायद्याचे आहेत तेच अधिकारी जिल्ह्यात आणा व त्यांना चांगले काम करुन द्या अशी मागणी आता नागरीक करत आहेत.