विधान भवन व मंञालय परिसरात पोलीसांचा तगडा पहारा
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता, उद्याचा दिवस संपला कि अधिवेशनाचे दोन दिवस संपणार. पहिला दिवस तर आरोप प्रत्यारोप करण्यात गेला. दुसर्या दिवशी ही मंडळी काय करतात हे ही पाहणे गरजेचे आहे. परंतु मराठा आरक्षण,ओबीसीचे राजकिय आरक्षण यासह इतर प्रश्नी माञ राज्य सरकार घाबरलेलेच दिसून येत आहे त्याचे कारणही तसेच आहे. मंञालय व विधान भवन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यासह इतर बाबीतुन राज्य सरकारचा घाबरट पणा उघड होत आहे.
सोमवार व मंगळवार हे दोन दिवस राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाचे आयोजन केलेले असून पहिल्या दिवशी १२ आमदारांचे निलंबन करण्याचा विषय संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला पण महाराष्ट्राच्या विकासासाठी काय करावे यासाठी सत्ताधारी पुढे आले नाही किंवा विरोधी पक्ष पुढे आला नाही. पहिला दिवस हा फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच गेला. दुसर्या दिवशी ही मंडळी विकासाच्या मुद्दावर बोलतात का परत आज सारखेच करतात हे ही पाहणे गरजेचे आहै. निवडूण दिलेल्या प्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृहात आवाज उठवणे गरजेचे असते. परंतु पक्षाशी बांधील असणारी मंडळी शेपूट वाकडे करुन बसलेली दिसते. जो पर्यंत नेते सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लावणार नाहीत तो पर्यंत हे असेच सुरु रासणार यात शंका नाही. फक्त नावालाच अधिवेशन न घेता लोंकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे.