प्रारंभ वृत्तसेवा
करोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. लशीबाबता अजूनही अनेक नागरीकांच्या मनात संकोच आहे. हा संकोच दुर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने एक वेगळे पाऊल उचलले आहे. लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार आहेत. आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचे उद्दीष्ट शक्य तितक्या लोकांना लसीकरण करणे आहे.
डॉ. रशीद म्हणाले, “राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे करोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य विभागाचा संकलित अहवाल पंजाब प्रांतात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. लशीचा पहिला डोस घेणऱ्या 4 ते 5 लाख लोकांनी लशीचा दुसरा डोस घेतला नाही. पाकिस्तानमध्ये 2 फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमसुरू झाली आहे.