तय्यबनगरच्या महिला मतदारांनी घड्याळाचा गजर करण्याचा केला निर्धार
गेवराई प्रतिनिधी ः- गेवराई विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई दाभाडे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सौ. विजेता विजयसिंह पंडित यांनी गेवराई शहरातील विविध प्रभागांचा प्रचार दौरा करून महिला मतदारांशी संवाद साधला. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि विविध सुविधांसाठी गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला विविध कामे करायची असून माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शहराचा कायापालट करून तिचे स्मार्ट शहरात रुपांतर करायचे आहे. त्यासाठी गेवराई नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवावा असे आवाहन सौ. विजेता विजयसिंह पंडित यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे व प्रभाग क्र.११ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार व दुर्दाना बेगम सलीमोद्दीन फारुकी यांच्या प्रचारार्थ आ. विजयसिंह पंडित यांच्या सुविद्य पत्नी सौ. विजेता पंडित यांनी डोअर टू डोअर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी महिलांच्या विकासासाठी महत्वाच्या अशा योजना राबविल्यवा आहेत. लाडकी बहिण योजना सरकारने राबवून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आर्थिक भेट दिली. माजी आ. अमरसिंह पंडित व विद्यमान आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली महिला स्वयंसहाय्यता बचत गट, दारुलउलूम येथे शादीखाना बांधकाम, विविध चौकांचे सुशोभिकरण अशा विविध विकास कामांनी गती घेतलेली आहे. लहान मुलांसाठी संजयनगर, तय्यबनगर, इस्लामपूरा, कोरबु मोहल्ला, खडकपुरा आदी भागांत अंगणवाड्या सुरु करायच्या आहेत. गेवराई शहरात विविध प्रकारचे विकास कामे करून गेवराई शहर आपल्या स्मार्ट सिटी बनवायचे आहे, यासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई दाभाडे, नगरसेवक पदाचे उमेदवार माधव बेद्रे, दुर्दाणा बेगम सलीमोद्दीन फारुकी, वसीम फारुकी यांच्यासह नजमा बाजी, बुशरा बाजी, शेख शबाना बाजी, सय्यद आयशा, फिरदोस बाजी, शेख फरीदा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या सौ. मुक्ताताई आर्दड, सौ. पल्लवी गोगुले, सौ. अनिता काळे, सौ. योगीता तांबारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
















