बीड : पेठ बीडच्या विकासासाठी ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या अमृत काका सारडा यांच्या उमेदवारीला जिल्हा न्यायालयाने कायदेशीर मान्यता देत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी कायम ठेवण्याचा जो निर्णय दिला होता, त्यावर दाखल झालेल्या अपीलवर मा. न्यायमूर्ती एस. आर. शिंदे मॅडम यांच्या कोर्टाने सुनावणी केली आणि त्यानंतर उमेदवारी कायम ठेवण्याचा आदेश देत अमृत काका सारडा यांच्या बाजूने निकाल दिला.
निवडणूक प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि सादर करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की उमेदवारी निवडणूक नियम आणि कायद्यानुसार वैध आहे.
या सुनावणीदरम्यान ॲड. बालाप्रसाद जाजू यांनी कायदेशीर बाजू प्रभावीपणे मांडली. याचप्रमाणे २०१६ सालीही अमर नाईकवाडे यांनी याच पद्धतीने कैलास बीयानी यांच्यावर तक्रार केली होती, मात्र तेव्हाही त्यांची याचिका फेटाळली गेली होती.२०१६ मधील प्रकरणातील न्यायालयीन नोंदींचाही या प्रक्रियेत संदर्भ देण्यात आला आणि त्या आधारेही उमेदवारी योग्य असल्याचे न्यायालयाने स्वीकारले.अमृत काकांच्या बाजूने निकाल दिला. अमृत काका सारडा यांच्या बाजूने ॲड. बालाप्रसाद जाजू,ॲड.राधेश्याम जाजू यांनी बाजू मांडली. तर अमर नाईकवाडे यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचे ॲड. सय्यद तौफिक यांनी बाजू मांडली. पेठ बीड शहर विकास कृती समितीच्या माध्यमातून जात, पात, धर्म न पाहता हजारो नागरिकांच्या सुख-दुःखात उभे राहणारे, विकासाचे काम प्रत्यक्षात करणारे आणि लोकांचा विश्वास जिंकलेले अमृत काका हे या निवडणुकीत आघाडीवर आहेत हे चित्र स्पष्ट झाले आहे.
पेठ बीडच्या विकासासाठी दृढ संकल्प
अमृत काका सारडा यांनी पेठ बीड शहर विकास कृती समितीच्या माध्यमातून अनेक वर्षे सातत्याने काम केले असून त्याममध्ये पायाभूत सुविधा, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक सहाय्य आणि नागरिकांच्या गरजांशी निगडित सेवा या क्षेत्रांत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
















