परळी प्रतिनिधी : -खा. बजरंग सोनवणे , प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या उपस्थितीत, दीपक देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश घेतला. यात जितेंद्र मस्के ,प्रभाग क्रमांक १७ मधून सय्यद मुजफ्फर हुसेन बी शेख सलीम यांनी अध्यक्षपदाचा अपक्ष फॉर्म भरला होता त्यांनी परत घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ( शरद पवार) प्रवेश घेतला. तसेच, आरिफ युनिस काकर जुन्या रेल्वे स्टेशन यांनी ३५ कार्यकर्त्यांसह आपल्या पक्षात प्रवेश केला .प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवार इलियास शेख यांनी पक्षात जाहीर पाठिंबा दिला . प्रभाग क्रमांक १५ मधून शेख अल्ताफ यांनी आपल्या पक्ष प्रवेश घेतला .साठे नगर येथील मुन्ना केशव मस्के आणि श्रीकांत मस्के यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश घेतला.
प्रभाग क्रमांक तीन बरकत नगर मधून इमरान सलीम सय्यद यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला
प्रभाग क्रमांक चार साठे नगर सोमेश क्षिरसागर यांनी पन्नास कार्यकर्त्यांसह आपल्या पक्षात प्रवेश घेतला .प्रभाग क्रमांक दोन मिलिंद नगर विभागातील प्रवेश शेख यांनी ७० कार्यकर्त्यांसह आपल्या पक्ष प्रवेश घेतला
जुना रेल्वे स्टेशन परिसरातील प्रभाग क्रमांक आठ मधील शेख वजीर चांद उर्फ सीएम आणि शेख युनूस शेख इस्माईल यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश घेतला .प्रभाग क्रमांक तीन मधून अपक्ष उमेदवार कुरेशी मुस्तकीन रेयाज यांनी पक्षाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा जाहीर केला. हे प्रमुख पक्षप्रवेश पाहता निवडणुकीच्या अनुषंगाने आ. धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे.

















