नगरपरिषद निवडणूक प्रचारात तुतारीला उत्स्फूर्त जनसमर्थन
बीड प्रतिनिधी – आम्ही भूमिकेशी कधीही तडजोड करणार नाही, शेवटपर्यंत भूमिकेशी आणि पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ राहून लोकांसाठी कायम रस्त्यावर काम करू. आमचे सर्व उमेदवार हे लोकांसाठी उपलब्ध असणारे आहेत त्यामुळे मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी मतदारांना केले.
शनिवारी (दि.२२) रोजी बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.स्मिताताई वाघमारे व वॉर्ड क्रमांक १५ चे उमेदवार पंकज बाहेगव्हाणकर, मनिषाताई आगे आणि वॉर्ड क्रमांक २२ चे उमेदवार शेख सुमैय्या शेख वसीम, शेख शमशीर शेख फेरोज यांच्या प्रचारार्थ शहरातील मित्रनगर व मिल्लतनगर भागात कॉर्नर बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मित्रपक्ष शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह या भागातील हजारो नागरिक उपस्थित होते.

















