प्रभाग क्र.11 मध्ये मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
गेवराई प्रतिनिधी ः- माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आ. विजयसिंह पंडित यांनी नेहमीच गेवराई विधानसभा मतदार संघाच्या विकासाच्या मुद्यावर राजकारण केलेले आहे. सामाजिक सुरक्षा व आर्थिक विकास हाच त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. या मुद्यावर त्यांची चालू असलेली यशस्वी वाटचाल विरोधकांना खूपत आहे. त्यामुळे विरोधक भावनिक राजकारण आणि भुलथापा देऊन अपप्रचार करत आहेत. विरोधकांचा डाव ओळखून विकासाच्या मुद्यावर माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शितलताई दाभाडे यांनी केले. प्रभाग क्र.11 मधील प्रचार दौऱ्यात मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
गेवराई नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभाग क्र.11 मधील शिक्षक कॉलनी दत्त नगर, वाणी मंगल कार्यालय आदी भागांचा सौ.शितलताई दाभाडे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलतान त्या म्हणाल्या की, विरोधकांकडे सत्ता असताना त्यांनी लोकांसाठी काम न करता स्वार्थ साधला. भुलथापा देऊन दहा वर्षे गेवराईतील जनतेला झुलवत ठेवले. आता निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा कविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु जनता त्यांना याचे उत्तर मतदानातून दिल्याशिवाय राहणार नाहीत असे सांगून माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक सुरक्षा व आर्थिक विकास या मुद्यांवर काम करत आहेत. त्यामुळे सर्व जाती धर्मांच्या लोकांना सामाजिक सुरक्षा देऊन शहराचा आर्थिक विकास करण्यासाठी घड्याळ या चिन्हावर मतदान करून माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उमेदवार माधव बेद्रे, वसीम फारुकी यांच्यासह दत्ताभाऊ पिसाळ, जालिंदर पिसाळ, शैलेश तोष्णीवाल, विनोद मोरे, शरीकभाई, बाळू पिसाळ, महेश मिसाळ, अशोक हातागळे, बाळू हातागळे, मन्सूरभाई, महिला आघाडीच्या सौ.मुक्ताताई आर्दड, सौ.पल्लवी गोगुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
















