परळी प्रतिनिधी – सध्या परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरू असून, निवडणूक निर्णय अधिकारी पक्षपाती भूमिका घेत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख यांनी आरोप केला आहे. याबाबत सविस्तर असे, परळी वैजनाथ येथील निवडणूक अधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिका घेत आहेत. असे निवेदन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास दिले आहे .या निवेदनात सौ. संध्या दीपक (नाना) देशमुख यांनी वैजनाथ येथे दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या उमेदवार अर्ज छाननी प्रक्रियेत येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर पक्षपात केला आहे.असे म्हटले आहे. या निवेदनात सविस्तर असे म्हटले आहे की, उमेदवारांना जर कोणाच्या अर्जाबाबत आक्षेप असेल तर अधिकाऱ्यांनी सांगितले की तुमचा आक्षेप पुराव्यासह नोंदवा. परंतु जर इतरांना दुसऱ्या कोण्याही उमेदवाराचे अर्जच जर निवडणूक आयोग / अधिकाऱ्यांनी दिलेले नाहीत तर आम्ही आक्षेप कसे नोंदवू? असा प्रश्न संबंधित निवेदनात उपस्थित केला आहे.
कागदपत्रांची मागणी केली तर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन दिवसांनी कागदपत्र मिळतील असे सांगितले. पण, आक्षेप घ्यायची तारीख आणि दिवस आजच म्हणजे १८ नोव्हेंबर २०२५ आहे. एवढ्या कमी अवधीत शक्य नसल्याने परळी नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक व्यवस्थेचे प्रमुख म्हणून सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करून लोकशाही वाचवून जनतेला न्याय द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे. सदरील निवेदन भारतीय निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त,बीड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी,सर्व प्रकारचे प्रसारमाध्यमे आदींना यांना देण्यात आले आहे.