कृष्णानगर,गंगासागर नगर,कीर्तीनगर काढले पिंजून
परळी वैजनाथ प्रतिनिधी – परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या सौ. संध्या दीपक देशमुख यांनी प्रत्यक्ष दारोदारी जाऊन संवाद व गाठीभेटी घेत मतदारांना संवाद साधताना विकासासाठी आश्वासित करीत आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये तसेच प्रभागामध्ये जाऊन मतदारांशी हितगुज करत तेथील समस्या आणि प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विकासाचे व्हिजन घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. शहरातील गंगासागर नगर, कृष्णा नगर व कीर्ती नगर मध्ये, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख यांच्या जनसंवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यावेळी नागरिकांनी सौ. संध्या दीपक देशमुख यांच्याशी मनमोकळा संवाद साधून परळीला भयमुक्त करण्याचे आवाहन सौ.संध्या देशमुख यांना केले. स्वच्छ परळी साठी व भयमुक्त परळी साठी आपला आशीर्वाद हवा आहे. असे त्या मतदारांना आश्वासित करीत होत्या. यावेळी जनसंवाद पदयात्रेस मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मतदार नागरिक ही मोठ्या संख्येने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या देशमुख यांच्या जनसंवाद यात्रेत उपस्थित होते.















