बीड जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आसलेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी परळी मतदासंघासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप पिके हातातून गेली आहेत तसेच जन जीवन विस्कळीत होऊन प्रचंड वाताहत झाली असल्याचे नमूद करत माजी मंत्री, आ. धनंजय मुंडे यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्यातील निकषानुसार जिल्ह्यातील शेतकरी व आपत्ती ग्रस्तांना मदत करण्याची लेखी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन आ. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना दिले आहे.