मैंदा व बेलुरा येथे शेकडो कार्यकर्त्यांचा आ.संदीपभैय्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
बीड प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीची प्रचार अंतिम टप्प्याकडे सरकत असताना बीड मतदार संघात आ.संदीप क्षीरसागर यांची ताकद आणखी मजबूत झाली आहे. शुक्रवारी (दि.१५) दुपारी बीड मतदारसंघातील मैंदा व बेलुरा येथील युवकांनी मोठ्या संख्येने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.या सर्वांचे बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि महाविकास आघाडीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांनी स्वागत केले. तसेच आपल्या सर्व युवक, तरुण मित्रांच्या खांद्याला खांद्या लावून मतदारसंघात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला.
मैंदा व बेलुरा येथील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी आ.संदीप क्षीरसागर यांनी संवाद साधला. जेव्हा सर्वसामान्य नागरिक आणि युवक एकजुटीने उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहतो, तेव्हा त्या उमेदवाराचा विजय नक्कीच होतो. युवकांनी आणि नागरिकांनी माझी निवडणूक हातात घेतली आहे. विरोधकांच्या भूलथापांना व अमिषेला बळी न पडता मोठ्या संख्येने दररोज अनेकांचे जाहीर पक्षप्रवेश होत आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीने मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी काळात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला. येथे वीस तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी उत्तरेश्वर घुमरे (मा.उपसरपंच), पंजाबराव घुमरे (मा.सरपंच),गोरख घुमरे, अमोल मौंदेकर, अशोक कसबे, महारुद्र घुमरे, गणेश दुकानदार, गणु दादा, पोपट कसबे, परमेश्वर नाना घुमरे, लाला घुमरे, गंगाधर बाप्पा घुमरे, प्रदीप कसबे, नंदू राठोड, सतीश भोर, चंदू सगळे, दत्ता पाटील,नितीन घोटे,बळी कसबे, बाप्पा घुमरे, अमोल उपडे, एस.पी.घुमरे, दत्ता मोमीन मेंबर, अभिषेक घुमरे, महेश गडसिंग, दत्ता पाटील घुमरे, कैलास लांडे तसेच पांडुरंग गवते युवा सेना जिल्हाप्रमुख बीड, रामेश्वर गवते, बालाजी गवते, ज्ञानेश्वर लाटे, संपत ढवळे, कुमार भाऊ गवते, रावसाहेब जिजा गवते, गोपाल गवते, नंदू गवते, दत्ता गवते, बाळू गवते, मच्छिंद्र लाटे, सचिन गवते, विशाल गवते, भाऊसाहेब गवते, महादेव गवते, भारत गवते, गोरख गवते, तुकाराम गवते, पप्पू गवते, बजरंग गवते, अशोक लाटे, दादासाहेब गवते, अजय गवते, ज्ञानेश्वर ढवळे व इतर मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.