तुतारी वाजवणारा माणूस’चिन्हासमोरील बटन दाबून मतदार संघाच्या विकासासाठी पुन्हा सेवेची संधी द्या-आ.संदीप क्षीरसागर
रायमोहा, खालापूरी पंचायत समिती गणातील मतदार संवाद दौर्याने दिली विजयाची साक्ष
बीड प्रतिनिधी : बीड मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी काम करताना ग्रामीण भागातील घरकुल असो की रस्ते, सभागृह,पिण्याच्या पाण्यासाठीची सिंचन व्यवस्था,शेतकरी,कष्टकर्यांचे प्रश्न याबाबत सातत्याने तुमचा प्रतिनिधी म्हणून आवाज उठवला. मतदारसंघाच्या हिताचे इतर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि आपल्या नेत्यांच्या विचारांचा अन् विकासाचा वसा,वारसा पुढे घेवून जाण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रत्येक मत माझ्यासाठी महत्वाचे आहे म्हणूनच येत्या बुधवारी (दि.२०)‘तुतारी वाजवणारा माणूस’चिन्हासमोरील बटन दाबून मतदार संघाच्या विकासासाठी सेवेची संधी द्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.
बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१५) मतदार संघातील खालापूरी व रायमोहा या पंचायत समिती गणाचा दौरा करत कार्यकर्ते आणि सर्व मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून संवाद साधला. खालापूरी येथील या संवाद दौर्याला उपस्थित प्रचंड मोठा जनसमुदाय आ.संदीपभैय्यांच्या विजयाची साक्ष देणारा ठरला.
याप्रसंगी पुढे बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, राजकीय आणि सामाजिक जीवनात वाटचाल करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षातील सर्व जेष्ठ अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन घेवून आपण कायम बीड मतदारसंघात विकासाच्या विविध योजना आणून जनतेची कामे केली. प्रलंबित विकासकामे सभागृहात मांडली, लोकहिताचे प्रकल्प पुर्ण व्हावेत म्हणून वारंवार पाठपुरावा केला. यातील बहुतांश कामांना मंजूरी आणली. भविष्यातही मतदारसंघाच्या विकासाचा आलेख आपल्याला उंचावत ठेवायचा आहे. आपल्याकडून सर्वांची कामे व्हावीत,अशी सरळ साधी विचारधारा आणि प्रत्येकाविषयी आपुलकीची भावना ठेवून मी व माझे सर्व सहकारी राजकीय व सामाजिक जीवनात काम करत आहोत. आपण हे जाणून आहात. मात्र आता निवडणूक लागली म्हणून आपले राजकीय विरोधक केवळ टिका करत आहेत.
मतदारसंघातील कामे करण्याचा, जनतेला निर्णयप्रक्रियेत सोबत घेण्याचा आणि कायम संपर्कात राहण्याचा कोणताही अनुभव नाही विरोधकांकडे आहे का? असा प्रश्न करत आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, विरोधक आपल्या कामांवर आरोप करण्यातच समाधान मानत आहेत.माझ्यावर आरोप करत विकासकामे आम्ही मार्गी लावू असे सांगणारे विरोधक मागील पाच वर्षात मतदारसंघातील किती गावात पोहचले? तेथील कोणते प्रश्न त्यांना माहित आहेत? त्यावर उपाययोजना काय करायच्या याबाबत त्यांनी उत्तर द्यावे असा सवालही आ.संदीप क्षीरसागर यांनी केला. बीड मतदारसंघाला विकसित करुन पुढे घेवून जाण्यासाठी मी कटिबध्द आहे. विरोधकांना कितीही टिका केली तरी आपण मतदानादिवशी कृतीतून उत्तर देवू असा विश्वासही आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
बीड शहर असो, ग्रामीण रस्ते,नालीकाम,सभागृह, विविध योजना मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, व संबंधित मंत्र्यांना भेटून विकासकामांसाठी भरीव निधी आणून कामे पुर्ण केली आहेत हे मतदारसंघातील जनता जाणून आहे. त्यामुळे आगामी विकास कामे करण्यासाठी तुम्हा सर्वांची साथ अशीच कायम राहू द्यावी.विचारांचा आणि विकासाचा वसा वारसा आपल्याला पुढे घेवून जायचा आहे. तुम्हा सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरुन बीड मतदार संघाचे प्रलंबित विकास कामे आणि विविध योजना मार्गी लावण्यासाठी मी कटिबध्द आहे.म्हणून येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील मतदान यंत्रावरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारांना केले.याप्रसंगी परिसरातील मतदार,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.