गेवराई प्रतिनिधी : आपल्या उभ्या राजकीय कारकीर्दीत आपण पंचायत समिती ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदापर्यंत अनेक पद उपभोगली परंतु मला त्याचा कधीच मोह राहिला नाही आणि राहणार ही नाही. या पदांचा वापर मी जनकल्याणासाठी केला आहे आणि यापुढेही अविरत सेवा सुरूच ठेवणार आहे मतदारांनी विकास करणारा आपला हक्काचा माणूस ओळखून २० तारखेला जागृत राहून मतदान करावे असे आवाहन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी आपल्या प्रचारार्थ मतदार संघातील विविध गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी आपल्या प्रचारार्थ तालुका पिंजून काढला आहे. विविध पंचायत समिती जिल्हा परिषद गणातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते म्हणाले की सत्ता असो अथवा नसो आपण सदैव विकासाचा ध्यास घेऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी आहोत. खुर्चीची लालसा मला कधीच नव्हती आणि असणार ही नाही. गेल्या कित्येक दशकापासून जनतेतून गायब असलेले आमचे विरोधक आता तुमच्यासमोर येतील. मतांचा जोगवा मागतील. हाता पाया पडतील, कदाचित लोटांगणही घेतील. त्यांना काय विकास केला याचा जाब विचारा, त्यांच्या भूलथापाना आणि अमिष्याला बळी पडू नका. योग्य निर्णय घेण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलेली आहे. मी व माझा परिवार कायम जनतेच्या सुखदुःखात आपल्या सोबत आहोत. संपूर्ण तालुक्याला मी माझा परिवार मानत आलेलो आहे. माझा हा संघर्षाचा लढा जनसेवेसाठी आहे माझ्या स्वार्थासाठी नाही. पद येतील जातील. तालुक्यातील जनताच माझ्या साठी सर्वस्वी महत्वाची आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव माझी धडपड असते. मिळालेल्या सत्ता स्थानांचा वापर आपण जनकल्याणासाठी केलेला आहे. हीच विकासाची घोडदौड तालुका भरात सुरू ठेवण्यासाठी येत्या २० तारखेला मला संधी देऊन प्रचंड मताधिक्याने विधानसभेत पाठवा. त्या संधीचे मी सोने केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्ही दिलेली संधी ही निश्चितच फळाला येईल असा आशावाद त्यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.