मुस्लिम भागाचा विकास विनायकराव मेटेंनी केला.
बीड (प्रतिनिधी) अपक्ष उमेदवार डॉ ज्योती विनायकराव मेटे यांची प्रचार सभा काल दि. १४ नोहेंबर रोजी बीड येथील मक्का चौक मोमिनपुरा भागात परा पडली यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. मुस्लिम आरक्षण प्रश्न विधिमंडळात मांडणारे पाहिले बिगर मुस्लिम नेते विनायकराव मेटे होते असे प्रतिपादन या सभे दरम्यान डॉ.ज्योती मेटे यांनी केले या प्रसंगी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सलीम पटेल, शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते खालेद पेंटर शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,शहर अध्यक्ष सुहास पाटील, आशुतोष मेटे, काझी नईम सहाब अमजद पठाण, कुतुब शेख , आबेद शेख, लाला भाई , सलामन आली, अख्तर पेंटर, आबास भाई, नदीम शेख आदी उपस्थित होते.
कोरोना काळात विनायकराव मेटे साहेबांनी मराठा आरक्षण मोर्चा काढला तेव्हा मुलिस्म समाज देखील खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. शेहेंशावली दर्गा विकसासाठी अडीच कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली ती कामे प्रगती पथावर चालू आहेत.ताकिया कब्रिस्तान येथे रस्त्यासाठी निधी दिला. तसेच मुस्लिम मुलीच्या वसतिगृहाचा प्रश्न लावून धरला होता. मुस्लिम भागात विनायकराव मेटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून विकास काम करण्याचे काम केले आहे. आता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात देखील मुस्लिम समाज पाठीशी आहे. मराठा मुस्लिम भावा प्रमाणे नांदत आहे. आता ही एकजूट मतदानात देखील दिसणार आहे. असे मत बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी मोमीनपुरा येथील जाहीर सभेत मत व्यक्त केले.
खालेद पेंटर यांनी काढले नगर पालिकेच्या कारभाराचे वाभाडे
बीड नगर पालिका गेली अनेक वर्ष क्षारसगरांच्या ताब्यात आहे. या नगर पालिकेने बीडकरांना सुविधा तर दिल्या नाहीत मात्र नगर पालिकेत भ्रष्टाचार माजवला आहे. बीड शहर आणि नगर पालिका वाचवायची असेल तर डॉ. ज्योती मेटे यांनी विजयी करा.