लोकसभे प्रमाणे विधानसभा मध्ये महत्त्वची भुमिका .
कोणीही मुस्लिम समाजाची मत स्वता: ची जाहागिरी समजवु नये.
बीड (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीचे मतदान येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. आता मतदानाला फक्त एक आठवड्याचा कालावधी उरलेला असतानाही एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांनी अजून पर्यंत आपली भूमिका जाहीर न केल्याने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शफिक भाऊंनी आपली भूमिका कधी जाहीर करतात व काय निर्णय घेतात याकडे सर्व मुस्लिम समाजाचे लक्ष आहे.
एआयएमआयएम पक्षाने बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवार दिला नाही. तसेच पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊंनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा मागे घेतला आहे. आणि आता प्रत्यक्ष मतदानाला फक्त एक आठवड्याचा कालावधी उरलेला असतानाही शफिक भाऊंनी अद्याप पर्यंत आपली भूमिका जाहीर न केल्याने मुस्लिम समाजामध्ये शफिक भाऊ काय निर्णय घेतात . यांच्या औवघे मुस्लिम समाजाचे लक्ष लागुन आहे .जेणेकरून मुस्लिम समाजाने बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांपैकी नेमके कोणत्या उमेदवाराला मतदान करावे याचा निर्णय मतदारांना घेता येईल असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.
चौकट
लोकसभा निवडणुकीत घेतली होती स्पष्ट भूमिका
काही महिन्यांपूर्वी देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळी सुद्धा एआयएमआयएम पक्षाने बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार दिला नव्हता तसेच लोकभावना व परिस्थिती पाहता यांनी जुलमी भाजपला रोखण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन शफिक भाऊंनी केले होते. यामुळे सर्व मुस्लिम समाजाने एकवटून बजरंग सोनवणे यांना भरघोस मतदान केले होते. यामुळे अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात बजरंग सोनवणे यांना मुस्लिम समाजाने दिलेल्या एक गठ्ठा मतांमुळे व एम आय एम न दिलेला उमेदवार यामुळे विजय मिळाला होता. हा निकाल ताजा असताना यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला फक्त एक आठवड्याचा कालावधी उरलेला असतानाही शफिक भाऊ आपली भूमिका स्पष्ट करावी.अशी भावना जनतेतून होत आहे.