केंद्रांसारखं राज्यातही महायुतीचे सरकार आल्यास महाराष्ट्र लवकरच ‘सुजलाम्-सुफलाम्’
नांदेड । भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या जिल्हयातील किनवट व भोकर येथे रेकॉर्डब्रेक सभा झाल्या. सभांना मतदारांची झालेली तुफान गर्दी महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. केंद्रासारखं राज्यातही महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केलं.
किनवट मतदारसंघातील बोधडी या गावात महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ आ. पंकजाताईंची जाहीर सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर उमेदवार भीमराव केराम, प्रदेश उपाध्यक्ष गजानन घुगे, नांदेड उत्तरचे जिल्हा अध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, सुधाकर भोयर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या राठोड, जिल्हा सरचिटणीस संदीप केंद्रे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, बेरोजगारांच्या हाताला काम , कष्टाळू माय माऊलींच्या चेहऱ्यावर सन्मानाचं हसू व डोक्यावर छप्पर देणारं केवळ आपलं अर्थात महायुतीचं सरकार आहे. जे की, बोललं ते करून दाखवीत असते. महाविकास आघाडी तर केवळ पोकळ आश्वासन देते नंतर शब्द फिरविते. सुरूवातीला लाडकी बहीण योजनेस विरोध करणारे व बंद पाडण्याचा प्रयत्न करणारे आता स्वत: ही योजना राबवून जास्त रक्कम द्यायचे बोलतात. त्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या शासन काळात महिलांसाठी अशी योजना का राबविली नाही ?, असा खडा सवाल करीत महाविकास आघाडीच्या खोट्या आश्वासनांचे त्यांनी वाभाडे काढले.केंद्रात महायुतीच्या सरकारची हॅटट्रिक झाली, त्यामुळे आता राज्यातही महायुतीचेच सरकार येणं गरजेचं आहे. कारण केंद्र आणि राज्यात एकच सरकार असेल तर तमाम महाराष्ट्र ‘सुजलाम्-सुफलाम्’ व्हायला वेळ लागणार नाही. पर्यायाने या किनवट मतदार संघाचाही चेहरा-मोहरा बदलला जाऊन या भागाचा विकास वेगाने होईल,असं त्या म्हणाल्या.
*भोकरला तुफान सभा*
——-
भोकर विधानसभेच्या भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारासाठी आज आ. पंकजाताई मुंडे यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “भोकर विधानसभेच्या उमेदवार ज्याच्या नावात श्री आणि जय अशा श्रीजया चव्हाण. श्रीजया चव्हाण आणि संतुकराव हंबर्डे दोघांनाही विजयी करा. मी 2009 पासून भाजपाची स्टार प्रचारक आहे. या वेळेस मला निवडणूक लढवायची नाही. मी मोकळीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सभा घेऊन उमेदवार निवडून आणायचे आहेत.मी तुम्हाला विनंती करणार आहे. येत्या 20 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा. कमळ लक्ष्मीचं वाहन आहे. श्रीजया नवीन उमेदीच्या तरुण चेहरा आहे. संतुकराव हंबर्डे यांना निवडून द्या. ते डायरेक्ट सत्तेत जाणार आहेत असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.