एकवेळ विजयसिंह पंडित यांना विजयी करून सत्ता द्या
गेवराई प्रतिनिधी ः- लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा असावा तो फक्त आजारपणाचे कारण सांगून घरात बसणारा नसावा. सत्ता असूनही ज्यांना आपल्या भागाचा विकास करता येत नाही त्यांना लोकप्रतिनिधी म्हणावे कसे ? विरोधकांनी मिळालेल्या सत्तेचा वापर फक्त स्वार्थ साधण्यासाठी केला, विकासाचे आणि त्यांचे सोयरसुतक नव्हते अशी सडकून टिका करत मला जर सत्ता मिळाली तर विकास काय असतो हे मी करून दाखवतो फक्त एकवेळ महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना विजयी करून विकासपर्वाला प्रारंभ करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले. महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील राक्षसभुवन, गुळज, पाथरवाला, कुरणपिंप्री, बोरगाव आदी गावांना भेटी देवून मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि तालुक्यामध्ये रखडलेल्या विकास योजना गतीमान करण्यासाठी सत्ता हवी आहे. सत्ता नसतानाही मी जलसिंचनावर मोठे काम केले, तालुका पाणीदार व्हावा ही आपली प्रामाणिक भुमिका आहे, येणाऱ्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहिल. केवळ निवडणुकीपुरते आपण भाषणे ठोकत नसून यापूर्वीही लोकांच्या कामात होतो आणि यानंतरही कामात राहील याची मी ग्वाही देतो. गेवराई विधानसभा मतदार संघात पुन्हा विकासाच्या कक्षेत आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना प्रचंड मतांनी विजयी करा असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी राक्षसभुवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्यासह तात्यासाहेब नाटकर, काकासाहेब नाटकर, शमीयोद्दीन काझी, राजाराम वालेकर, संभाजी नाटकर, जहूर काझी, कल्याण नाटकर, रघु कोंढरे, बालासाहेब पाठक, प्रदिप काळम, जगन्नाथ धुमाळ, बोरगाव येथे अशोक जाधव, परिक्षीत जाधव, ब्रम्हनाथ जाधव, तात्या जाधव, भाऊसाहेब जाधव, कुरणपिंप्री येथे बालम पटेल, आर.के.पटेल, कलीम पटेल, शेख बादशाहभाई, अजीज पठाण, अयुब शेख, रज्जाक पटेल, नाजीम पटेल, नसीर पठाण, गुंतेगाव पाथरवाला येथे सरपंच बाबासाहेब जाधव, नंदकिशोर गोर्डे, चंदू जाधव, मदन गोर्डे, सुनिल पारे, सोमनाथ मस्के, गंगाधर हाके, पाराजी भवर, सुभाष गोर्डे, गणेश गुंते, धनंजय जाधव, विष्णूपंत आर्सुळ, रुस्तूम घनवट, अंकुश वाकडे, गुलाब वाकडे, शेख निजाम, प्रविण घनवट, विक्रम गवारे, शामराव आर्सुळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमरसिंह पंडित यांच्या कॉर्नर बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विजयसिंह पंडित यांच्या विजयासाठी आपण सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करून गेवराई विधानसभा मतदार संघात घड्याळाचा गजर करून विकासपर्वाला सुरु करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मतदार भगिनींनी अमरसिंह पंडित यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ग्रामस्थ, प्रतिष्ठीत नागरीक, मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.